Shri Shivaji Vidya Prasarak Sanstha's
Late Karmaveer Dr. P. R. Ghogrey Science College,
Dhule, Maharashtra
'A+' Grade NAAC Re-Accredited
Affiliated to Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon
- Shri Shivaji Vidya Prasarak Sanstha's Late Karmveer Dr. P. R. Ghogrey Science College, Dhule
- We cordially invite you for the "Discovery of Flights: A National Conference for Enthusiastic Bird Watchers," scheduled for October 21st and 22nd, 2023..
- Shri Shivaji Vidya Prasarak Sanstha's Late Karmveer Dr. P. R. Ghogrey Science College, Dhule
अविष्कार स्पर्धेसाठी निवड झालेले विद्यार्थी सोबत त्यांचे मार्गदर्शक प्राध्यापक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम व्ही पाटील, उपप्राचार्य, इ.
Date: 03/11/2023
डॉ. घोगरे विज्ञान महाविद्यालयातील आठ विद्यार्थी आविष्कार विद्यापीठ स्तरासाठी निवड.
धुळे येथील श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे कै. कर्मवीर डॉ. पा.रा. घोगरे विज्ञान महाविद्यालयांच्या आठ विद्यार्थ्यांचे तथा सहा संघांचे अविष्कार -2023 स्पर्धेमध्ये संशोधन प्रकल्प विद्यापीठ स्तरीय स्पर्धेसाठी विद्यापीठाच्या संशोधन समितीने निवड करण्यात आले आहेत. ऑक्टोबर महिन्यामध्ये शिरपूर येथील आरसी पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल एज्युकेशन अँड रिसर्च येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धेमध्ये जिल्हाभरातून 1300 हून अधिक विद्यार्थ्यांनी आपले संशोधन प्रकल्प सादर केले होते.
घोगरे महाविद्यालयाच्या संगणक शास्त्र पदवी विभागातील एक संघ ज्यामध्ये डिंपल चव्हाण आणि हर्षल सोनार यांनी रीसेंट सायबर अटॅक अँड सायबर अवेअरनेस या विषयावरती आपले संशोधन सादर केले यांना डॉ. स्वाती बोरसे यांचे मार्गदर्शन लाभले. वनस्पतीशास्त्र पदवीत्तर विभागामध्ये ऋतुजा महाजन हिने खानदेशी मेलेड्सचा चांगल्या आरोग्यासाठी उपयोगीता असा संशोधन प्रकल्प प्रत्यक्ष विविध पदार्थ बनवून सादर केला तिला डॉ. दत्ता ढाले यांचे मार्गदर्शन लाभले. रसायनशास्त्र पदवित्तर विभागातील वेदांत सनेर आणि प्रशांत पाटील यांनी इको फ्रेंडली सिंथेसिस ऑफ सम नोवेल डेरिव्हेटिव्ह फ्रॉम एन सायक्लिक इमाईड बाय युजिंग लेड ऑक्साईड नॅनो पार्टिकल्स असा संशोधन प्रकल्प सादर केला त्यांना डॉक्टर सविता पाटील यांचे मार्गदर्शन केले. संशोधनार्थी विद्यार्थ्यांमधून वनस्पतीशास्त्र विभागाची विजयालक्ष्मी शेळके यांचे फंगस स्टडीज ओन रायझोस्पियर सोईल फंगी फ्रॉम बनाना क्रोप्स वरील संशोधन सादर केले त्यांना प्रोफेसर किशोर बोरसे यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे संशोधनार्थी विद्यार्थ्यातून रसायनशास्त्र विभागातील प्रदीप पाटील यांनी बायोफ्रेंडली सेल्फ हीलिंग अँटिकोरोजीव कोटिंग असा संशोधन प्रकल्प पोस्टच्या साह्याने सादर केला त्यांचे मार्गदर्शक डॉ. चेतन पाटील आहेत.
तसेच गिरीश देसले यांनी स्पाम डिटेक्शन मॉडेल युजिंग लिंग्विस्टिक अँड बिहेवियरल फिचर हे संशोधन मॉडेलच्या साह्याने सादर केले त्यांना डॉ. स्वाती बोरसे यांचे मार्गदर्शन लाभले.
अशाप्रकारे घोगरे विज्ञान महाविद्यालयातील पदवी वर्गातील एक संघ, पदवित्तर वर्गातील दोन संघ आणि संशोधनार्थी विद्यार्थी यांचे तीन संघ यांचे पिवर सायन्स, इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, एग्रीकल्चर अँड ऍनिमल हजबंडरी, हुमानिटीज अँड सोशल सायन्सेस अश्या विविध कॅटेगरी मध्ये आपल्या संशोधनाचे प्रदर्शन करण्यासाठी निवड झाली आहे. या संशोधनाचा उपयोग शेतकऱ्यांबरोबर सामान्य माणसाला आजच्या फास्ट फूडच्या जमान्यामध्ये मिलेट्स पासून मिळणाऱ्या पोषक तत्त्वांचा उपयुक्तता सांगणारे उपयुक्त संशोधन, सायबर अटॅक पासून आपली सुरक्षा, रसायनांचे जैनंदिन जीवनातील महत्त्व, उपयुक्त असणारे सॉफ्टवेअर डेव्हलपेंट यासह विविध विषयावरती पुढील टप्प्यात अधिक जोमाने संशोधनातून प्रकाश टाकणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर व्ही. पाटील, उपप्राचार्य प्रा. किशोर बोरसे, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रोफेसर संध्या पाटील, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. जे. टी. पवार, संगणक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. राकेश देवरे, महाविद्यालय अविष्कार समन्वयक डॉ. दत्ता ढाले, संघ प्रमुख प्राध्यापिका पूनम सोनवणे, प्राध्यापिका पूजा माळी, महाविद्यालयातील विविध विभाग प्रमुख, प्राध्यापक, तसेच संशोधनासाठी मदत करणारे सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.