Shri Shivaji Vidya Prasarak Sanstha's

Late Karmaveer Dr. P. R. Ghogrey Science College,

Dhule, Maharashtra

'A+' Grade NAAC Re-Accredited

Affiliated to Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon

बहूजन हिताय | बहूजन सूखाय ||

आदिशक्ती श्री एकविरा देवी मंदिरात मोफत आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

Date: 25/10/2023

         

दि. २३, धुळे येथील, श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे कै. कर्मवीर डॉ. पां. रा. घोगरे विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि जवाहर मेडिकल फाउंडेशन संचलित अण्णासाहेब चुडामन पाटील स्मृती वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने आज नवरात्रीनिमित्त आदिशक्ती श्री एकविरा मातेच्या मंदिरात मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.

नवरात्री मधील महानवमी असलेल्या दिवशी खास करून महिला वर्गासाठी आरोग्य आणि विविध आजारांबद्दल जनजागृती करण्यासाठी आजचे हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. पारिवारिक जबाबदारी पार पाडत असताना महिलांचे स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्षच होत असते त्यामुळे त्यांना विविध आजारास बळी पडावे लागते.

नवरात्रीमध्ये आपण नारी शक्तीचा जागर करत असतो या दिवसात आपण महिलांचा सन्मान करत असतो म्हणूनच खास महिला वर्गासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून हा एक वेगळा उपक्रम राबविण्यात आला.  सदर उपक्रमास जवाहर मेडिकल फाउंडेशन संचलित अण्णासाहेब चुडामन पाटील स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील डॉक्टरांच्या समूहाने मंदिरात आलेल्या सर्व महिला भक्तांचे आरोग्य तपासले. यामध्ये रक्तदाब, नेत्र तपासणी, रक्तातील साखरेची पातळी व इतर आवश्यक असलेल्या चाचण्या या ठिकाणी घेण्यात आल्या, या शिबिरामध्ये एकूण 497 महिला भक्तांनी सहभाग नोंदविला 

या उपक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉ. एम. व्ही. पाटील, जवाहर मेडिकल फाउंडेशन चे जनसंपर्क अधिकारी श्री हेमंत पाटील यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले, तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. शिवाजी मधुकरराव कोष्टी,  विद्यार्थी कल्याण विभागाचे प्रा. डॉ. आर. जी. महाले, स्वयंसेवक स्वानंद, प्रेमराज निकम, हेमांगी पाटील, वृंदावना पाटील, कृष्णा निकम प्रमोद कुमार चौरसिया, शुभम पाटील,  योगिता हालोर,  निकिता भावसार व इतर स्वयंसेवक आणि स्वयंसेविका यांनी परिश्रम घेतले.