Shri Shivaji Vidya Prasarak Sanstha's
Late Karmaveer Dr. P. R. Ghogrey Science College,
Dhule, Maharashtra
'A+' Grade NAAC Re-Accredited
Affiliated to Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon
- Shri Shivaji Vidya Prasarak Sanstha's Late Karmveer Dr. P. R. Ghogrey Science College, Dhule
- We cordially invite you for the "Discovery of Flights: A National Conference for Enthusiastic Bird Watchers," scheduled for October 21st and 22nd, 2023..
- Shri Shivaji Vidya Prasarak Sanstha's Late Karmveer Dr. P. R. Ghogrey Science College, Dhule
डॉ. पां. रा. घोगरे विज्ञान महाविद्यालयात पक्षी निरीक्षण व संवर्धन विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन*
Date: 23/10/2023
डॉ. पां. रा. घोगरे विज्ञान महाविद्यालयात पक्षी निरीक्षण व संवर्धन विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन*
धुळे: श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे, कै. क. डॉ. पां. रा. घोगरे विज्ञान महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभाग व निसर्ग वेध संस्था संस्था धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने पक्षी निरीक्षण व संवर्धन या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे नुकतेच आयोजन करण्यात आले डिस्कवरी ऑफ फाइट्स या विषयावर चर्चासत्रात विचार मंथन करण्यात आले.
राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन *श्री. शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे चेअरमन तथा धुळे ग्रामीणचे आमदार मा. बाबासाहेब कुणालजी पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले*. सदर उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा. प्राचार्य डॉ. एस. एस. राजपूत अधिष्ठाता विद्या शाखा क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, मा. डॉ. अनिल महाजन अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलन प्रा. डॉ. व्यवहारे, प्रा. डॉ भागवत, पी.बी. बागल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. लोहार, प्राचार्य डॉ. एम. टी. पाटील, प्राचार्य डॉ एम व्ही यांनी, उपप्राचार्य प्रा. के. एम. बोरसे, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा एम. डी. व्ही. अहिरराव, चर्चासत्राचे समन्वयक प्रा. डॉ पी. एन. महाले आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
सदर राष्ट्रीय चर्चासत्रासाठी संस्थेचे चेअरमन मा. बाबासाहेब कुणालजी पाटील व उपाध्यक्ष मा. डॉ. एस. टी. पाटील, मा. प्रफुल्लजी सिसोदे, प्रशासकीय अधिकारी श्री. प्रमोदजी पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक प्रा. डॉ. डी. एल. फंड, निसर्ग वेध संस्था यांचे विशेष
लाभले.
संस्थेचे ध्येय, उद्दिष्टे व महाविद्यालयाचा परिचय तसेच चर्चा सत्राचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ एम व्ही पाटील यांनी केले.
देशातील विविध राज्यांतील निसर्ग अभ्यासक व पक्षी मित्र एकत्र चर्चा करून , आपण सर्वांनी सभोवतालचा निसर्गाचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी काय करता येईल यासाठी प्रयत्न करावा असे अध्यक्ष भाषणात आमदार बाबासाहेब कुणालजी पाटील यांनी सांगितले .
दोन दिवशीय या परिषदेत विविध राज्यातील 208 संशोधकांनी पोस्टर व ओरल सादरीकरण केले.
सदर चर्चा सत्र यशस्वीतेसाठी प्रा. आय. एस. अहिरराव, डॉ. पाटील, डॉ एम. व्ही. अमृतसागर, डॉ . अमोल नंदवाळकर, डॉ. गणेश नागरे, डॉ. निखिल चौधरी, प्रा. प्रतीक्षा गावित, रजिष्ट्रार श्री. मुकेश पाटील, कार्यालय प्रबंधक श्री. शशिकांत पाटील, तसेच सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.