Shri Shivaji Vidya Prasarak Sanstha's

Late Karmaveer Dr. P. R. Ghogrey Science College,

Dhule, Maharashtra

'A+' Grade NAAC Re-Accredited

Affiliated to Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon

बहूजन हिताय | बहूजन सूखाय ||

आ.कुणाल बाबा पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त श्री शि. वि. प्र. संस्थेच्या, कै. कर्म. डॉ. पां. रा. घोगरे विज्ञान महाविद्यालयात 'भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

Date: 19/10/2023

         

धुळे: याबाबत सविस्तर वृत्त असे की, श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या, कै. कर्मवीर डॉ. पां. रा. घोगरे विज्ञान महाविद्यालयात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तसेच श्री शि.वि. प्र.संस्थेचे चेअरमन तथा धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान लोकप्रिय पाणीदार आमदार बाबासाहेब कुणालजी पाटील यांच्या वाढदिवस सप्ताह निमित्त प्राणिशास्त्र विभागाचा लिओ क्लब, राष्ट्रीय छात्र सेना विभाग, राष्ट्रीय योजना विभाग संयुक्त विद्यमाने श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच जवाहर फाउंडेशनचे अण्णासाहेब चुडामण पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धुळे यांच्या रक्तपेढी विभागाच्या सहकार्याने

 भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.  सदर कार्यक्रमाच्या उद्घाटन  विशाल खानदेशचे ज्येष्ठनेते माजी मंत्री मा. दाजी साहेब रोहिदासजी पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले, याप्रसंगी  धुळे उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री बाजीराव पाटील, धुळे तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. दरबार सिंग गिरासे, श्री. अरुण पाटील, युवक काँग्रेसचे श्री बापू खैरनार, यांच्यासह तालुक्यातील विविध नेते पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम‌. व्ही. पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून प्रास्ताविक केले. संस्थेचे चेअरमन मा. आ. कुणाल बाबा पाटील, उपाध्यक्ष मा.डॉ. भैयासाहेब डॉ. एस.टी. पाटील, मा. प्रफुलजी सिसोदे, प्राचार्य डॉ. मनोहर पाटील, उपप्राचार्य प्रा.किशोर बोरसे, प्राणिशास्त्र विभागप्रमुख प्रा. डी.व्ही. आहिरराव, कार्यालयीन प्रबंधक श्री मुकेश पाटील, कार्यालयीन अधिक्षक श्री . शशिकांत पाटील, वरिष्ठ लिपिक श्री.सोमनाथ पाटील यांच्या सह मोठ्या संख्येने  प्राध्यापक

शिक्षकेतर कर्मचारी वृंद आणि विद्यार्थ्यांनी शिबिराला भरभरून प्रतिसाद देवून 97 रक्तदात्यांनी रक्तदान केले. व  135 विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासणी करण्यात आली.सदर शिबिराचे आयोजन प्राणीशास्त्र  विभागाचे प्रा. डॉ. प्रविण महाले,  डॉ. सुनिल पाटील, डॉ. अमोल नंदवालकर, राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रा. के.एम. बोरसे, रासेयोचे डॉ. एस.एम.कोष्टी  यांनी केले.‌ शिबिराच्या  यशस्वीतेसाठी डॉ. हर्षल भामरे, प्रा. आय.एस. आहिरराव, डॉ. एम. व्ही. अमृतसागर, प्रा. निखिल चौधरी, डॉ. स्वाती पाटील, प्रा. पी. ए. मोरे यांनी  सहकार्य केले. रक्त संकलन अधिकारी म्हणून डॉ. महेश जोशी, श्री.‌चंदुलाल साठे, श्री.संजय चौधरी, श्री. हेमंत देवरे, की. अक्षदा पाटील, अजय डंगोरे, गणेश धाकड, गोकुळ राजपूत, नरेंद्र पाटील, अनिल आव्हाड, निवृत्ती पाटील, सलमान पठाण, पुनमचंद कोळी यांनी काम पाहिले.