Shri Shivaji Vidya Prasarak Sanstha's

Late Karmaveer Dr. P. R. Ghogrey Science College,

Dhule, Maharashtra

'A+' Grade NAAC Re-Accredited

Affiliated to Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon

बहूजन हिताय | बहूजन सूखाय ||

उपविभागीय अधिकारी महाविद्यालयांमध्ये करार; विद्यार्थ्यांमार्फत ‘महसूल’च्या योजना तळागाळापर्यंत

Date: 19/10/2023

         

महसूल विभागाच्या योजनांची माहिती शहरी व ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोचविण्यासाठी आता शहरातील सात महाविद्यालयांशी धुळे उपविभागीय अधिकारी कार्यालयाने सोमवारी (ता. ९) करार केला. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ ते २०२५-२६ या तीन वर्षांसाठी हा करार आहे. धुळ्यातील उपविभागीय कार्यालयात झालेल्या करारप्रसंगी उपविभागीय अधिकारी राहुल जाधव, शहर तहसीलदार विनोद पाटील, ग्रामीण तहसीलदार अरुण शेवाळे, नायब तहसीलदार संजय शिंदे, जयहिंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. पवार, एसएसव्हीपीएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्ही पाटील, उपप्राचार्य के. एस. बोरसे, विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकर वानखेडे, पालेशा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रभाकर महाले, गंगामाई महाविद्यालयाचे डॉ. एस. आर. पाटील, अभय महिला महाविद्यालयाचे डॉ. एस. जी. बाविस्कर, एसएनडीटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, डॉ. डी. झेड चौधरी आदी उपस्थित होते.