Shri Shivaji Vidya Prasarak Sanstha's

Late Karmaveer Dr. P. R. Ghogrey Science College,

Dhule, Maharashtra

'A+' Grade NAAC Re-Accredited

Affiliated to Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon

बहूजन हिताय | बहूजन सूखाय ||

Avishkar oct.2023

Date: 19/10/2023

         

दिनांक 18 ऑक्टोबर 2023 रोजी शिरपूर येथील आरसी पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल एज्युकेशन अँड रिसर्च येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धेमध्ये धुळे येथील श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे कै. कर्मवीर डॉ. पा.रा. घोगरे विज्ञान महाविद्यालय यांच्या 40 विद्यार्थ्यांनी आपल्या संशोधनाचे सादरीकरण केले. यामध्ये पदवी वर्गातील चार संघ पदवित्तर वर्गातील 15 संघ आणि संशोधनार्थी विद्यार्थी यांचे पाच संघ सहभागी झालेले होते. विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी तीन मॉडेल आणि 21 पोस्टच्या साह्याने पिवर सायन्स, इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, एग्रीकल्चर अँड ऍनिमल हजबंडरी, हुमानिटीज अँड सोशल सायन्सेस अश्या विविध कॅटेगरी मध्ये आपल्या संशोधनाचे प्रदर्शन विस्तृत केले. या संशोधनामध्ये शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणारे संशोधन, भूकंप रोधक घरे, जैविक विघटनशील प्लास्टिक, सायबर अटॅक पासून आपली सुरक्षा, सूक्ष्मजीवांच्या सहाय्याने प्लास्टिकचे विघटन, रसायनांचे जैनंदिन जीवनातील महत्त्व, स्त्री शक्तीचा आदर, कीटकनाशकांचे आरोग्यावर होणारे परिणाम, उपयुक्त असणारे सॉफ्टवेअर डेव्हलपेंट, आजच्या फास्ट फूडच्या जमान्यामध्ये मिलेट्स पासून मिळणाऱ्या पोषक तत्त्वांचा अभ्यास यासह विविध विषयावरती विद्यार्थ्यांनी संशोधनातून प्रकाश टाकला.

विद्यार्थ्यांच्या या संघासोबत महाविद्यालय अविष्कार समन्वयक डॉ. दत्ता ढाले, प्राध्यापिका पूनम सोनवणे प्राध्यापिका पूजा माळी हे संघ प्रमुख म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयातील विविध प्राध्यापक, विभागप्रमुख, उपप्राचार्य प्रा. किशोर बोरसे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर व्ही. पाटील यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.