Shri Shivaji Vidya Prasarak Sanstha's

Late Karmaveer Dr. P. R. Ghogrey Science College,

Dhule, Maharashtra

'A+' Grade NAAC Re-Accredited

Affiliated to Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon

बहूजन हिताय | बहूजन सूखाय ||

श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे, कै.कर्म. डॉ. पां. रा. घोगरे विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय मुल्यांकन व प्रत्यायन परिषद नॅक समितीची भेट*

Date: 12/08/2023

         

धुळे:  श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे, कै. क. डॉ. पां. रा. घोगरे विज्ञान महाविद्यालयात चौथ्या फेरीच्या पुर्नमुल्यांकनासाठी नॅक समितीने भेट दिली. नॅक ही उच्च शिक्षण संस्थांची शैक्षणिक गुणवत्ता व भौतिक सुविधा तपासणारी भारत सरकारची स्वायत्त संस्था आहे. विज्ञान महाविद्यालयाच्या चौथ्या फेरीच्या पुर्नमुल्यांकनासाठी नॅक समितीत अध्यक्ष प्रा. डी.एम. कृष्णस्वामी, माजी कुलगुरु पेरीयार विद्यापीठ, तामिळनाडु,  समन्वयक प्रा. डॉ. के. सत्यमूर्ती, वरिष्ठ शास्त्रज्ञ, एस.डी.एम. विद्यापीठ, धारवड व सदस्य प्राचार्य डॉ. कृष्णकांत गुप्ता, अग्रवाल पी.जी., वल्लभगड, हरीयाणा येथून आले होते. पहिल्या दिवशी सर्व प्रथम प्राचार्य, आय.क्यु.ए.सी. अध्यक्ष, समिती सदस्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत मान्यवर पाहुण्यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या कॅडेट ने नॅक समितीला मानवंदना दिली. नॅक समिती समोर महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी मागील पाच वर्षांची गुणवत्ता व महाविद्यालयात केलेल्या कामाचे सादरीकरण केले. तसेच महाविद्यालयातील सर्व विभागाचे विभागप्रमुखांनी समितीसमोर सादरीकरण केले. भोजनावेळी समितीने संस्थेचे अध्यक्ष मा. बाबासो कुणालजी पाटोल, उपाध्यक्ष मा.डॉ.एस.टी. पाटील, माजी प्राचार्य मा.डॉ. एस. एन. नंदन,  माजी प्राचार्य डॉ. डी.ए.पाटील यांच्याशी महाविद्यालयातील सुविधांबाबत चर्चा केली. दुपारच्या सत्रात नॅक समितीने महाविद्यालयातील विविध विभागात प्रत्यक्ष भेटी दिल्या. वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, पदार्थविज्ञान, संगणकशास्त्र, गणित, भूगोल, सूक्ष्मजीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जैवरसायन, पर्यावरणशास्त्र, बी. व्होक, बीसीए, डेटा सायन्स, ग्रंथालय, केंद्रीय संशोधन प्रयोगशाळा इ. शैक्षणिक विभागांचे परिक्षण केले. सायंकाळी विद्यार्थ्यांमार्फत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


भेटीच्या दुसन्या दिवशी महाविद्यालयातील कार्यालयीन कामकाज, वनस्पतीशास्त्र विभागाचे दुर्मीळ व दुर्लभ वनसप्तीच्या जतन व संवर्धनासाठी उभारलेले पॉलीहाऊस, प्राणीशास्त्र विभागाचे गांडुळ खत निर्मिती प्रकल्प तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राष्ट्रीय छात्र सेना विभाग, विद्यार्थी कल्याण विभाग, क्रिडा व सांस्कृतिक विभाग, मुलामुलींचे वसतीगृह व उपहार गृह या विद्यार्थी केंद्रीत सुविधा देणाऱ्या विभागांचे नॅकच्या निकषानुसार परिक्षण करण्यात आले. तसेच अभ्यासक्रम व त्याची अंमलबजावणी अध्ययन, अध्यापन व गुणवत्ता संशोधन, भौतिक सुविधा, विद्यार्थी सहाय्य व प्रगती, प्रशासन नेतृत्व, नाविण्य उपक्रम आदी बाबींचे समितीमार्फत मुल्यांकन करण्यात आले. महाविद्यालयातर्फे देण्यात येणान्या सुविधांबद्दल समाधान व्यक्त करून मा. संस्था अध्यक्ष, प्राचार्य व प्राध्यापक यांचे आभार मानले. तसेच शिक्षकेतर कर्मचारी वृंदांचे कामकाजाबद्दल विशेष कौतुक केले. सर्व तपासणी झाल्यानंतर समितीने प्राचार्य यांना गोपनीय अहवाल सुपूर्द केला.  


राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 लागू होत असताना महाविद्यालय नॅक मूल्यांकनाला सामोरे जात आहे याबद्दल  समितीने समान व्यक्त केले. भारतातील फक्त पाच टक्के स्वतःहून  नॅक मूल्यांकनाच्या चौथ्या सायकलला सामोरे जातात.  डॉ. पा. रा. घोगरे महाविद्यालय हे त्यातील एक महाविद्यालय आहे याबद्दल समितीचे अध्यक्ष डॉ क्रीष्णास्वामी यांनी संस्थेचे चेअरमन यांचे कौतुक केले.

सदर नॅक समितीच्या भेटीसाठी संस्थेचे चेअरमन मा. बाबासाहेब कुणालजी पाटील व उपाध्यक्ष मा. डॉ. एस. टी. पाटील, मा.प्रफुल्लजी सिसोदे, प्रशासकीय अधिकारी श्री. प्रमोदजी पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.  तसेच महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक प्रा. डॉ. डी. एल. फंड, डॉ. एच. के. महाजन, डॉ. व्ही. व्ही. पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.

महाविद्यालयाची नॅक समितीची भेट यशस्वी करणेकरीता प्राचार्य डॉ. एम. व्ही. पाटील, उपप्राचार्य प्रा. के. एम. बोरसे, नॅक समितीचे समन्वयक प्रा. अमित बिरारीस, रजिष्ट्रार श्री. मुकेश पाटील, कार्यालय प्रबंधक श्री. शशिकांत पाटील, तसेच सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.