Shri Shivaji Vidya Prasarak Sanstha's

Late Karmaveer Dr. P. R. Ghogrey Science College,

Dhule, Maharashtra

'A+' Grade NAAC Re-Accredited

Affiliated to Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon

बहूजन हिताय | बहूजन सूखाय ||

माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा

Date: 01/08/2023

         

आज दिनांक 29 /07/ 2023 वार शनिवार रोजी अगदी आगळावेगळा कार्यक्रम म्हणजेच माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा अतिशय उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम "न भूतो न भविष्यती "असा होता असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही."अर्थात आपण कॉलेजला असताना असा कार्यक्रम झाला नाही आणि याच्यापुढे सुद्धा असा कार्यक्रम होईल असे मला 99.99% वाटत नाही. झालास तर चांगली गोष्ट म्हणावी लागेल आणि त्या कार्यक्रमाला तुम्ही आपण असू की नाही हे सांगता येत नाही.प्राचार्य डॉ एम व्ही पाटील आणि त्यांची सर्व टीम यांचे नियोजन उत्कृष्ट होते.

  या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्याच्या त्याच्या बॅचला असलेल्या विद्यार्थी मित्रांची भेट झाली आणि आपल्या गुरुवर्यांच्या दर्शनाचा लाभ झाला तो आपण शब्दात व्यक्त करू शकत नाहीत. आमच्या वेळेचे विद्यमान प्राचार्य की ज्यांनी आमच्यासारख्या गरीब विद्यार्थ्यांसाठी बऱ्याच योजना राबवल्या आणि त्यामुळे आमच्यासारख्यांचे शिक्षण झाले हे सत्य नाकारून चालणार नाही ते म्हणजे आदरणीय श्री. बी.एम्. तात्या साहेब की ज्यांच्या दर्शनासाठी आमचे डोळे अगदी आतुर झालेले होते परंतु ते आजारी असल्या कारणाने आपल्याला भेटू शकले नाहीत म्हणून खंत वाटते.

   असो आजच्या कार्यक्रमासाठी आपले आदरणीय गुरुवर्य श्री. एम्. एम्. पवार सर आणि आपल्या सर्वांचे आवडते गुरुवर्य निसर्ग मित्र श्री. एम् .डी. सूर्यवंशी सर तसेच आमचे परममित्र राजेंद्र रोकडे यांनी अथक प्रयत्न केले म्हणून हा कार्यक्रम यशस्वी झाला हे नाकारता येणार नाही. आजचा दिवस आपल्या जीवनातील एक अविस्मरणीय क्षण होता असे म्हणावे लागेल.

  पुनश्च आदरणीय श्री. एम.डी. सूर्यवंशी सरांच्या व आदरणीय श्री.एम्.एम्.पवार सरांच्या अथक परिश्रमाला सलाम 🙏🙏🙏

एकंदरीत कार्यक्रम चांगला झाला.

     -- कृष्णा राजाराम पाटील, काळखेडा, धुळे


एस एस व्ही पी एस धुळे येथील डॉक्टर पां.रा. घोगरे विज्ञान महाविद्यालय 🏢 मध्ये दिनांक 29 जुलै 2023 रोजी गणित विषयातील अत्यंत  "मनोहारी"एकत्रीकरण-REUNION करणारे प्राचार्य डॉक्टर मनोहर पाटील व गणित विभागप्रमुख प्राध्यापक मनोहर सूर्यवंशी यांनी आयोजित केलेल्या सदर कार्यक्रमात गणितातल्या "दादी" डॉक्टर कुमारी पी. बी. माळवे व गणितातले "अण्णा" डॉक्टर के. बी.  पाटील तसेच गणितातले "दादा" मोठे भाऊ प्राध्यापक डी. डी. पाटील व गणितातला "मधुरपणा" सांगणारे डॉक्टर मधुकर पवार सर यांच्या अथक प्रयत्नाने अत्यंत देखणा, नियोजनबद्ध कुठेही रुसवे फुगवे न बाळगता भूतकाळात गणिती भाषेत कसे मन रमले याची प्रचिती दिल्याने ज्ञानदानासारखे पवित्र कार्य पुन्हा पुन्हा देताना वरील मंडळींचा जरादेखील उत्साह कमी झालेला दिसला नाही. पर्यायाने,आम्हा सारख्यांना एनईपी सारख्या नवीन अभ्यासक्रमात निश्चितच उपयोग होईल.

सदर कार्यक्रमाचा भाग होता आले याच्यासारखे दुसरे भाग्य खचितच नसावे.                       

-- डॉ. कैलास बोरसे, बीटको कॉलेज, नाशिक.




Also Visit माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावामाजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा (2)